गाणी व दंतकथा (Songs and legends)


वारल्यांच्या सर्व समारंभात धार्मिक विधी कटाक्षाने पाळले जातात. विवाह, जन्म आणि मृत्यू हे तीन समारंभ तर धार्मिक विधींनी भरलेले असतात. जमातीच्या देवदेवतांना प्रसन्न करतानाही धार्मिक विधींचे पालन केले जाते. धार्मिक विधींचे प्रामुख्याने दोन भाग पाडता येतील. ज्यात मुख्यत: गाण्यांचा समावेश असतो असा एक व दुसरा ज्यात गाणी नसतात असा भाग. हिरवा किंवा वाघया ह्या देवांना प्रसन्न करताना तसेच जन्मोत्सवाच्या वेळी गाणी म्हटली जात नाहीत. विवाह समारंभात व नारणदेवास प्रसन्न करण्याच्या समारंभात स्त्रिया जी गाणी गातात त्यात ह्या धार्मिक विधीचाही समावेश असतो. ही गाणी म्हणजेच समारंभाचा जणू प्राण असतो. विवाह समारंभाच्या वेळी गाणी म्हणण्याची जबाबदारी धवलेरीला दिलेली असते. वार्षिक श्राद्धाला उद्देशून गाणी म्हणण्याचे काम कामडी करतो, कारण त्याला ह्याव्यवसायाची चांगली माहिती असते. ह्या धार्मिक गाण्यात काही वेळेस दंतकथा असतात. ह्या दंतकथा मृत व्यक्तीच्या व्यवसायाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उद्देशून असतात. धार्मिक विधीच्या वेळी गायक फार सुंदर गाणी म्हणतो. त्याचबरोबर ह्या जमातीच्या कल्पना व श्रद्धा अंतर्भूत असलेल्या गाण्यांची तो रचना करतो. लहान गाण्यात सहसा वारल्यांच्या देवांची नावे असतात. एकाच देवदेवतेचा उल्लेख असलेले गाणे क्वचितच पहावयास मिळते.

धार्मिक गाण्यांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यावर हिंदूंच्या विचारांचा व दंतकथांचा झालेला प्रभाव होय. ह्या जमातीचा हिंदू जमातीशी अनेक पिढ्यांपासून असलेला संबंध; ह्यामुळेच हा प्रभाव घडून आला. ह्या गाण्यांचा शब्दश: अर्थ लावणे बरोबर होणार नाही. कारण काही गाण्यांमध्ये जीवनासंबंधी जे वर्णन केलेले आहे तशा प्रकारचे त्यांचे जीवन असेल असे सांगता येणार नाही. ह्या गाण्यांत त्यांच्या आशा आकांक्षांचे वर्णन असते. अशा तऱ्हेने त्यांच्या गाण्यांतून काही अंशी तरी आपणास त्यांची संस्कृती समजण्यास मदत होईल. समारंभ व विधी ह्यांचा वारल्यांच्या जीवनातील प्रसंगाशी संबंध असतो. त्यांची गाणी ही बहुतेक धार्मिक विधीशी संलग्न असतात, त्यामुळे सर्वसामान्य गाणी ह्या जमातीत फारशी आढळत नाहीत.

🔖 समाजातील विविध गाणी व त्यांची सविस्तर माहिती.

👉 शेतीशी संबंधित धार्मिक विधी (Rituals related to agriculture)

👉 जगातील असमानता (Inequality in the world)

👉 पावसाचे महत्त्व (Importance of rain)

👉 नारणदेवाच्या पूजेच्या वेळची गाणी (Songs during the worship of Lord Naran)

👉 स्त्रीची शुद्धता (Chastity of woman)

👉 दंतकथा (Legend)

👉 अंत्ययात्रेची गाणी (Funeral Songs)

👉 ब्राह्मण आणि कुणबी (Brahmins and Kunbis)

👉 मृत्यू ही अटळ घटना (Death is an inevitable event)

👉 यमाचे दूत बंदिस्त (Yama's messenger confined)

👉 गरोदरपण व प्रसूतीचे गाणे - A song of Pregnancy and Childbirth

👉 दागिन्यांची गाणी (Jewel Songs)

👉 बाशिंगाचे गाणे (A Song of Bashing)

👉 विवाहाची गाणी (Wedding Songs)

👉 उंबराचे गाणे (Umbra's song)