आदिवासींचे खरेखुरे आश्रयपीठ मारूती शिवराम बांडे उर्फ बांडे बाबा

Tribal Mahavikas


आदिवासींचे खरेखुरे आश्रयपीठ मारूती शिवराम बांडे उर्फ बांडे बाबा असे म्हणण्याची रीत आहे की, जिथे जात नाही आगगाडी तिथे जाते मोटारगाडी, जिथे जात नाही मोटारगाडी तिथे जाते खटारगाडीआणि जिथे जात नाही टारगाडी तेथे जातेपायाची गाडी. बांडे बाबांच्या गावाची रीतआशीच आहे. त्यांच्या गावाला आज एकविसाव्या शतकातही जायचे म्हटले तरीपायांचीच गाडी शिवाय पर्याय नाही. 

श्री मारूती शिवराम बांडे यांचा जन्म पुणे जिल्ह्याच्याजुन्नर तालुक्यातील सुकळवेढे गावी झाला. बांडेह्यांच्या गावचा. एकवीसाव्या शतकाच्या दृष्टीनेजो चेहरा मोहरा बदलायला हवा तो बदललेलानाही. आजही जुन्या वळणाच्या साहाय्याने तेथीलणसे किड्या-मुंग्यासारखे जीवन जगत आहेत.आज बांडे मामांनी ८८ व्या वर्षात पदार्पण केलेअसले तरी त्यांना त्यांची साधी जन्मतारीखहीमाहीत नाही. अशा या मारूती बांडेचा जीवनपट भल्याभल्यांना थक्ककरणारा आहे.सुकळवेढे गावातच फक्त नावालाच तिसरीपर्यंत शिक्षण घेणारे बांडेसांगतात की, "आई-वडील कळण्याचे वय नव्हते त्यावेळीच आम्हाभावंडाना पोरके करून गेले. आमची आई पांगळी होती एवढी एकच खूण वडीलधाऱ्यांनी तिच्या विषयी सांगितल्याचे आठवते. बाकी सर्व अंधार,वडीलांबाबत म्हणाल तर खोट्या अरोपापाई त्यांना जेलमध्ये जावे लागले होते.

ह्यापलिकडे त्यांच्याविषयी मी थोरला असतानाही फार काही माहीत नाही. सर्व भावंडाची जबाबदारी माझ्यावर असल्याने मी तरूण झालो आणिकाम करू लागलो" बांडे ह्यांना असलेली वडिलोपार्जित जमीन फारच थोडी होती. त्यांचेवडील 'वरसूआई' चे भगत असल्याने कुणी काही नैवद्य दिला की कुटुंबाची तेवढ्यावरच गुजराण व्हायची आणि ती सर्व भावंडे दोन-तीन दिवस तो नैवद्य पुरवून खायचे. त्यामुळे होती त्या शेतीकडेही दुर्लक्षच झाले होते.कुठेतरी डोंगरमाथ्यावर पारंपरिक पद्धतीने कुदळी, कुडवण्याने 'दळयाची माती खोदणे, मशागत करणे आणि त्याठिकाणी नाचणी, वरई सावा,खुराचणी अशी थोडी बहूत पीके खूप कष्टातून घेतली जायची. एवढ्याशाडोंगराळ आणि उजाड माळरानावारच्या शेतीत आपले काय निभावणारम्हणून तो जमिनीचा तुकडा लहान भावाच्या स्वाधीन करून बांडे काहीकाम धंदा मिळतोय का? ह्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागले. श्री.बांडे ह्यांचे लग्न झाले ते अवघे १० वर्षाचे असतांना त्यावेळी त्यांच्यापत्नीचे वय फक्त ७ वर्षाचे होते. त्यावेळी लग्न लवकरच होत. गुडघ्याला बाशिंग पाळण्याला बाशिंग, म्हणजेच बालविवाह पद्धती तर होतीच शिवाय"मेली तरी चालेल परंतु अठवार राहायला नकोय म्हणजे दुसऱ्यांसाठी मेली तरी चालेल असा अलिखित जणू कही नियमच होता. 

कामाचा शोधघेतांना बऱ्याचदा त्यांना सावकारांची बोलणी खावी लागायची. बाळ हिरडे आणि भादवडी हिरडे विकण्यासाठी घेऊन गेले की आडते आणि फसवा धंदा करणारे लोक त्यांचा माल हिसकावून घ्यायचे लुटालुट करायचे. त्याकाळी भुरट्या चोरांचाही फार सुळसुळाट होता. श्री. मारूती बांडेह्यांच्या गावामागे एक भली मोठी गडध होती तेथे नेहमी चोर असायचे.त्यांना भूक लागली की, ते शिटी वाजवायचे. शिटी वाजली रे वाजली की समजाचे चोर आले. मग गावातील काही जाणती माणसे आपल्या घरच्यांनाभाकरी आणि लसनाच्या मिरचीचा गोळा वाटायला सांगायची आणि त्याभाकरीची चवड चोरांना नेऊन द्यायची. त्यात बांडे देखील असायचे. त्याकाळी जंगलातील मेवा गुराख्यांबरोबर राहून मारूती बांडे यांनाहीमाहीत झाला होता. संध्याकाळच्या वेळेला माळरानावरच विस्तव पेटवूनत्यात बडदे आणि दिवे चांगले खरपूस भाजून त्याचा गोलीस करून खायचे आणि पोटात पडलेली भुकेची आग क्षमवायचे. बिगारी काम करणारे मजूसूर्य माथ्यावर आलाकी न्याहरीची तयारी करायचे, नागल्याच्या भाकरीत्यावर सुकट बोंबील किंवा हुळग्याचे आळण असायचे. ते खाऊन आणिथोडे बरोबर घेतले की चालला कामाला. काही सावकारांनी २ रूपये कर्जदिले आणि एक वर्षापर्यंत फेडले नाही की त्याचे १० रूपये व्हायचे.अशावेळी श्री. बांडे आणि त्यांचे साथीदार जंगलातून हिरडा बेहडा जमाकरून ठरावीक सावकार व्यापाऱ्यांना विकायचे आणि डोक्यावरील कर्जकमी करायचे. एखादे दिवशी वाघूर घेऊन सशाची पारध करण्यासाठीजायचे. तर कधी पडकईला इतर साथीदारांच्या बरोबर काम करायचे'हुळावळ्या'च्या घुगऱ्या आणि वालाचे निष्टवणी करून कसेबसे पोटभरण्याचे काम करायचे.श्री. बांडे ह्यांचे नातेवाईक श्री. नामाजी गवारी हे वसई येथे भाजीपाल्याच्यागाडीवर काम करत होते. ते एके दिवशी सुकळवेढे येथे आले आणि त्यांनीबांडे ह्यांची हालत बघितली. जाताना मारूती बांडे ह्यांना घेऊन ते वसईलागेले. बांडेही त्यांच्या बरोबर भाजीपाला नेआण करू लागले. ते पापडीगावात भगवान शेट ह्यांच्याकडेच राहू लागले आणि कुठेतरी हात गाडीवरनाष्टा करून पोटभरत होते. कष्ट फार पडायचे परंतु गावाकडे रानोमाळ हिंडण्यापेक्षा हे बरे होते. 

श्री. बांडे ह्यांनी डोक्यावर पाणी वाहून आणणे,भाजीपाल्याला पाणी वेळच्या वेळी शिंपणे आणि शेटची पडेल ती कामेकेल्याने श्री. भगवान शेट खुश होते. मूळात आदिवासींच्या रक्तात फसवणे,दगा देणे नसल्याने बांडे ह्यांचा प्रामाणिकपणा खूपच आवडला आणि त्यांनी बांडे ह्यांना मुंबईत १९५६ साली रखवालदार म्हणून आकाशवाणी केंद्रात भरती केले. भोळा स्वभाव, परंतु सर्वांची मिळून मिसळून वागल्याने बांडे ह्यांनी तेथील कार्यालयातील लोकांचीही मने जिंकली होती, आणि तेथूनच खऱ्या अर्थाने बांडे ह्यांचा समाजसेवेचा पिंड विकसीत होत गेला. मुंबईत सूर्यकुंडावर एक माणूस राहतो, त्याचे नाव मारूती बांडे तो आपल्या लोकांना मदत करतो, कामधंद्याचे बघतो अशी वार्ता लोकांच्या कानीगेली होती. मग काय जो कोणी मुंबईला जाईल तो बांडे ह्यांची भेट घेतल्याशिवाय व दोन-चार दिवस राहिल्या शिवाय येत नसे.मुंबईतल्या मरिन ड्राईव्हला आकाशवाणीचे कार्यालय असल्याने सगळीकडे पाणीच पाणी आणि समुद्राची शोभा पाहण्यात गावाकडचा माणूस गडून जायचा त्यांना मुंबईचे नवल वाटल्याशिवाय राहत नव्हते. मारूती बांडे स्वत:सांगतात, “माझ्याकडे फक्त आदिवासी जमातीचे लोक येत नव्हते तरमावळ, मुळनई, अहमदनगर पेहर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जातीचे, जमातीचे लोक भेटून जायाचे." दिवसभर मोठी वर्दळ सुरू असायची. 

बांडे साहेबही न कंटाळता सगळ्यांचे म्हणणे ऐकूण घ्यायचे आपल्या परीने सर्वांचे करायचे. अशातच १९६० साली बांडे ह्यांची पुणे येथे बदली झाली. आता कसे करायचे, पुण्यात कुठे राहायाचे असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. त्यावेळी जव्हार संस्थानचे १९वे राजे यशवंतराव मुकणे यांच्या भगिनी चांगुणाबाई नंदकर ह्यांच्या ओळखीने श्री. विठ्ठलराव तुपे ह्यांच्या जवळ हडपसर येथे बांडे आणि त्यांची पत्नी राहू लागले. त्यावेळी जव्हारचे बाबूराव जाधव ह्यांनीही बांड्यांना आश्रय दिला आणि इथेही बांड्यांनी चांगलाच जम बसविला. तो काळ अतिशय हालखिचा आणि धावपळीचा होता. त्यामुळे पुण्यात पोट भरण्यासाठी आणि नोकरीचा शोध घेण्यासाठी शेकडो तरूण इकडे तिकडे फिरत होते. त्याचवेळी पुणे अॅम्युनिशन फॅक्टरी, एच.ई.फॅक्टरी, देहू रोड ऑर्डिनन्स डेपो, तळेगाव व्हेकल डेपो, ७१२ वर्कशॉप खडकी, रेल्वे पोस्ट ऑफिस, वेधशाळा, पोलीस दल, लष्कर इ. शासकीय कार्यालयांत मोठ्या प्रमाणात आदिवासी तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होती. चीन, पाकिस्थान बरोबर झालेली युद्धे आणि त्यामुळे लष्करी साहित्य सामुग्रीच्या फॅक्टरी आणि डेपोमधून आदिवासी तरूणांना मोठया प्रमाणावर भरती करण्याचा तो काळ असल्यामुळे पुणे, अहमदनगर नाशिक जिल्ह्यांतील व अनेक आदिवासी तरूणाचा लोंढा सेवायोजन कार्यालयाच्या दारात,शिवाजीनगर एस. टी. स्टँडवर असतं. आकाशवाणीकेंद्र शिवाजीनगरएस.टी.स्टँडजवळ सल्याने अनेकांची ठण्याबसण्याची जागा वेळप्रसंगी निवासाची, जेवणाची आणि अगदीच वेळ आली तरतिकीटांच्या पैशांचीही सोय ह्या बांडे नावाच्या समाजप्रेमी माणसाकडूनहोते हे समजायला अनेकांना वेळ लागयचा नाही. त्यामुळे पन्नाशेक वर्षापूर्वी मारूती बांडे ह्यांचे घर म्हणजे आडल्या नडलेल्यांचा एक निवारा आणि आसरा होता. ओळख असो-नसो, कोणीही त्यांच्याकडे गेले की,मोठ्या आदबीने आणि आपुलकीने चौकशी करायला ते अजिबात विसरायचेनाहीत, त्यावेळी त्यांचे समाज प्रेम जागे व्हायचे आणि जमेल तेवढी माहीती देत, कुठे जायचे, काय करायचे, कोणाला भेटायचे याची इत्यभूत माहिती बसल्या जागेकरून बांडे देत.

ह्या चांगुलपणामुळे हा माणूस त्याकाळातच नव्हे तर संपूर्ण नोकरीच्या कारकिर्दीत एवढा काही लोकप्रिय झालाकी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातत्याच्या नावाचा गाजावाजा झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील जाणकार आणि कार्यकर्ती मंडळी आकाशवाणीतल्या मारूती बांडेना ओळखत नाहीत असे होणे शक्यच नाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरील काम करणारा एक सामान्य रखवालदार काय करू शकतो याची प्रचिती श्री. बांडे यांनी भल्या भल्यांना दिली होती. त्यांच्या स्वभावाचे आणि व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू जवळून पाहण्याचा आणि अनुभवाचा ज्यांना ज्यांना प्रत्येक आला त्यापैकी कालकथीत डॉ. गोविंद गारे हे एक होत. ते म्हणतात, “श्री. मारूती बांडे हे दिसायला, बोलायला फक्त साधा माणूस मात्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाची झेप अनेकांना थक्क करणारी अशीच सन १९६४ साली मी एम.ए. झाल्यावर नोकरी नव्हती. पीएच.डी. करण्याचा माझा इरादा होता. पण राहण्याची आणि जेवणाची सोय नसल्याने ते शक्य होत नव्हते. पीएच.डी. साठी संपूर्ण पुण्यात कुठेही वसतिगृहाची सोय नव्हती, काय करावे या विवंचनेत हातो.आकाशवाणीत कोणीतरी बांडे नावाचे गृहस्थ गरजुंना मदत करतात असे कानावर आले होते. एके दिवशीअनंतराव पोटे हे ह्या समाजातील पहिले वास्तुविशारद, अभियंता त्यांच्याबरोबर मारूती बांडे ह्यांच्या घरी जाण्याचा योग आला. गावाकडच्या आणि पुण्यातल्या गप्पागोष्टी झाल्या. 

बोलण्याच्या ओघात माझी अडचण मीत्यांना सांगितली, क्षणाचाही विलंब न करता तो समाजहितचिंतक म्हणाला, "गारेसाहेब, तुमच्या सारख्यांना मदत करायची नाही तर मग कोणाला करायची. हे बघा मी या सरकारी खोलीत राहतो. तुम्हाला इथे राहता येईल.तुम्ही खूप शिकावे, समजाचे नाव मोठे करावे ह्यासाठी मला येण्यासारखे आहे ते मी जरूर करील. पण मी आहे रखवालदार गडी! माझापगार कितीसा असणार मी पैशाची मदत तुम्हाला करू शकणार नाही. बाकी दोनवेळेचे जेवणखाण म्हटले तर, आमच्या दोघांच्या (नवराबायकोच्या)जेवणात तिघांचे आपण कसेबसे भागवू" हे ऐकूण गारेसाहेबांना आश्चर्याचाधक्काच बसला ते म्हणाले, “माझी हाकच वरती ऐकू गेल्याने मला हा आश्रय मिळाल्याचा आनंद होत होता. त्यावेळी अंगाला शहारे आणि मनाला जो आनंद झाला तो अवर्णनीय ! बांडे ह्यांच्या माणसांबद्दलच्या प्रेमाचा नावलौकिक ऐकला होता, परंतु त्यादिवशी त्याचा प्रत्यक्ष अनुभव प्रत्याला आला. एक साधा रखवालदारकी करणारा मोठ्या दिलदार मनाच्या त्या माणसापुढे मी खरोखर नतमस्तक झालो. पुढे तब्बल दोन वर्ष मी बांडे ह्याच्या सहवासात काढली. त्यांच्याकडे काहीही न करता मी मोफत जेवत असल्याची मला नेहमी खंत वाटे. परंतु माझाही इलाज नव्हता मी त्या काळात त्यांना खाणावळही देऊ शकत नव्हतो." ते कधी तरी म्हणत,गारेसाहेब वाईट वाटून घेऊ नका, आणि काळजीही करू नका. तुम्हाला जेव्हा केव्हा नोकरी लागेल, तेव्हा मला खाणावळ द्या आणि तुम्ही ती नाही दिली तरी मला वाईट वाटणार नाही. 

माझ्या समाजातल्या एका तरूणाच्या शिक्षणासाठी माझ्या सारख्या एका सामान्य माणसाचा हातभारलागला यातच मी आनंद मानील.! श्री. मारूती बांडे ह्यांचे ते बोलणे भल्याभल्यांना जिंकणारे असे होते.पुढे डॉ. गोविंद गारे ह्यांना पार्टटाईम का होईना नोकरी मिळाली, त्यावरत्यांनी पीएच.डी. चे संशोधन केले, नंतर गोखले अर्थशास्त्र संशोधन संस्थेतनोकरी लागली. समाजात आणि बाहेर त्यांचे बऱ्यापैकी नावही झाले मात्रत्यांचे आणि बांडे कुटुंबियाचे संबंध कधीही तुटले नाहीत. पुढे तर गारे साहेबांचे लग्न जमविण्यातही बांडे ह्यांनीच पुढाकार घेतला आणि त्यांच्या लग्नाची मिरवणूक आपल्याच घरापासून काढून सोमवार पेठेत रामचंद्र साबळे ह्यांच्या घरी गेली. त्यातही श्री. आणि सौ. बांडे मोठ्या उत्साहाने आघाडीवर होते. 

ज्यावेळी डॉ. गारे लंडनला शिकण्यासाठी गेले त्यावेळी बांडे ह्यांच्या इतका आनंद दुसरा कुणालाही झाला नसेल. डॉ. गारे हे बांडे ह्यांच्या घरी राहणारे आणि या समाजातील पहिले एम.ए., पहिले पीएचडी झालेले आणि इंग्लंडलाही जाणारे पहिले तरूण आणि त्यांना आश्रय देणारे आपण म्हटल्यावर बांडे ह्यांना त्याचा रास्त अभिमान वाटत होता त्याहीपेक्षाडॉ. गारे ह्यांची निवड भारतीय प्रशासन सेवेत (आय.ए.एस.) झाली.त्यावेळी फार समज नसलेल्या बांडे ह्यांना परमोच्च आनंद झाला होता.हे झाले एक व्यक्तिगत उदाहरण. मात्र त्या काळात पुण्यात शिकणाऱ्या बहुतेक तरूणांना बांडे यांनी मदतीचा हात दिला होता, सहकार्य केले होते.त्यावेळी बांडे ह्यांचे घर सर्वांना आश्रयस्थान वाटायचे. त्याला कारणही तसेच होते. बांडे ह्यांच्या जिव्हाळ्याने, आत्मियतेने, आपुलकीने अनेक विद्यार्थी कष्ट करून शिक्षण घेत होते. त्यातील समाजातील पहिले इंजिनिअरकी अमेरिकेत स्थायिक झाले आहेत ते श्री अनंता पोटे, डॉ. बाळ तिटकारे सेवायोजन अधिकारी प्रल्हाद पोटे, सीताराम सुपे, वार्ड ऑफिसर प्रतापराव देशमुख, विक्रिकर अधिकारी डी.बी. घोडे, उपनिबंधक तेव्हाचे आणि आजचे साखर संकुल येथील सहसचिव श्री डी. आर. घोडे, शिक्षणाधिकारी तुकाराम जाधव, कृष्णा भालिंगे, भूमापन उपसंचालकदगडू मडके, आमदार कृष्णकांत मुंढे, भगवान तिटकारे, मारूतराव तिटकारे,आदिवासी विकास अधिकारी ग.पा. खमसे, पासपोर्ट अधिकारी विश्वास डेंगळे, बँक मॅनेजर नाथू घाडगे अशी ही माणसे वर्ग 'अ' आणि विशेष वर्ग 'अ' मध्ये नोकरीला लागली ती बांडे यांच्या आश्रयाने आणि सहकार्याने.१९६८-७० चा तो काळ, त्यावेळच्या पुण्यातील शिकलेल्या तरूणांचे बांडे ह्यांचे घर म्हणजे एकत्र जमण्याचे आणि विचारविन्मय करण्याचे हक्काचे केंद्र बनले होते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचा आणि इतरांना भेटण्याचा बांडे यांचे घर सर्वांना मोकळे असे. 

केवळ तरूण पिढीतीलच मंडळी बांडे ह्यांचेकडे जमत होती असे नव्हे ज्ञानदानाचे काम करणारी मंडळीही इथे येत. त्यात रावसाहेब तिटकारे, कावजी पोटे गुरूजी, रावसाहेब बो-हाडे गुरूजी, सखाराम रेंगडे गुरूजी, निंबाजी रोंगटे गुरूजी, कोंडाजी बोकड, नामदेव गाडेकर, गणपत बांबळे, नारायण लोहकरे, उमाजी तिटकारे,झांजरे गुरूजी, खेमा रावते, बापू शेंगाळ, किसन साबळे, मारूती गभाले अशी अनुभवी गुरूजन मंडळी बांडे यांच्या घरी जमून आपल्या समाजासाठी काय करता येईल ह्यांचा विचार विनिमय करत असत. 

त्याकाळी ह्या गुरूजनांचा नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातचांगलाच दबदबा होता. अनेक आदिवासी तरूण त्यांच्या हाताखालीशिकून वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरली असली तरी या सर्वांना त्याचा आत्मियतेचा धाक होता. या धाकामुळेच अशातरूणांना वाकड्या वाटेने जाण्याची कधीच हिंमत झाली नाही. अशाकाही विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी, आपुलकीने चौकशी करण्यासाठी सर्वांचे एक हक्काचे केंद्र होते ते म्हणजे बांडे ह्यांचे निवासस्थान.मारूती बांडे ह्यांचेकडे इतर सामान्य लोक तर येतच येत, मात्र समाजातील मंत्री, राजे आमदार, खासदार अगदी जव्हारचे यशवंतराव मुकणे, त्यांच्या भगिनी चांगुणाबाई नंदकर (जव्हार) आमदार बाबुराव जाधव, आमदार शंकरराव पोटिंदे, आमदार कलावती करवंदे (जव्हार), आमदार भगवंतराव गायकवाड (दिंडोरी), आमदार गणपतराव घारे (इगतपूरी), आमदार बी.के.देशमुख, आमदार यशवंतराव भांगरे, आमदार नारायण नवाळी (सर्व अकोले-राजूर), कृष्णराव मुंढे (खालापूर, जून्नर), ही सर्व मंडळी बांडे यांचे घरी वरच्यावर यायची. सभापती आणि जि.प. सदस्य धोंडूबुवा साबळे,चिंतामणराव मोरमारे, सूर्याजी बांबळे, शंकरराव केंगले, नामदेव नाडेकर,धोंडिबा कारभळ, दाजी चिमा गोडे यांची सतत उठबस बांडे ह्यांचे घरी असायची. समाजकार्यकर्त्यांत अण्णा आढारी, किसन साबळे, बोकड गुरूजी, रखमा सांगडे, शंकरराव केंगले हे सर्व आदिवासी सेवक देखील कोणत्याही कामानिमित्त पुण्यात आले की, बांडे ह्यांचे घर त्यांना चर्चेसाठीसदैव खुले असायचे. 

ह्या सर्व माणसांच्या येण्याजाण्याचा वाईट परिणाम असा झाला की,मारूती बांडे ह्यांचेकडे समाजातील सर्वच माणसे कशी येतात ही जादू तरनाही. असे बोगस कोळी जातील काही कार्यकर्त्यांना वाटत असे. त्यांनी लगेच बांडे ह्यांचेकडे येणेजाणे सुरू केले, मैत्री वाढवली. त्यात भाऊसाहेब राऊत, आमदार सुमंत राऊत (कर्जत), पुण्यातील बबनराव परदेशी, दादाकोंडक्यांचे मोठे बंधू धोंडीभाऊ कोंडके, श्री. एल. आर. पंडीत (कोल्हापूर),ही मंडळी आपण होऊन येत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आणिआपण एकच आहोत असे बांडे साहेबांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करत. ह्यामागचे गुपीत असे होते की, श्री. बांडे ह्यांनी कोळी महादेव समाजातील पुढाऱ्यांना, कार्यकर्त्याना पटवून द्यावे, मध्यस्थी करावी. मात्रमारूती काही कच्च्याशिष्याचे चेले नव्हते. डॉ. गोविंद गारे नेहमी वरच्यावरह्या घुसखोरांविषयी बांडे ह्यांच्या बरोबर चर्चा करत, त्यामुळे हा अवघड प्रश्न मारूती बांडे ह्यांना लक्षात आलाच होता. ही सर्व बोगस मंडळी आपण एकच आहोत हे पटविण्यासाठी सतत प्रयत्नशील असत व त्या दृष्टीने बांडे ह्यांनी आपल्याला मदत करावी, कोळी महादेव समाजातील पुढाऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्यांनी पटवून द्यावे असा आग्रह धरत. 

त्या सर्वांना बांडे यांचे एकच म्हणणे असे “तुम्ही आमचे मित्र जरूर आहात, तुम्ही आमच्याकडे या, बसा. परंतु तुम्ही आम्ही वेगळे आहोत हे तुम्हालाच काय परंतु सर्वांनाच मान्य करावे लागेल, आमचा कोळी महादेव समाज अद्याप लंगोटी लावून रानावनात भटकतो आहे. काही जंगलात मिळाले तर खातो आहे. नाहीतर आला दिवस कसातरी काळजावर हात ठेऊन ढकलतो आहे. तुमचे तर सगळे आबादीआबाद. मग तुम्ही आणि आम्ही एक कसे? मित्रहो! आपण एकत्र बसू, ऊठू, जेवणखान करू, पण तुमचा आमचा सोयरसंबंध म्हणजे पुढच्या दृष्टीने आमच्यासाठी 'नरकवास' ठरेल.हे आम्ही जाणून आहोत. म्हणूनच तुमचे आमचे जमणार नाही. हे लक्षात ठेवा.' हे बांडे ह्यांचे वक्तव्य ऐकले की, ती मंडळी नाराज होऊन जात. मात्र त्याची खंत बांडे ह्यांनी कधीही केली नाही. आपल्या समाजावर ज्या ज्या वेळी असा हल्ला होण्याची चिन्हे दिसायची त्यावेळी बांडे अतिशय सावध पवित्रा घेत काम करायचे. समाजातील गोर गरिबांपासून अनेक आमदार-खासदार, कार्यकर्ते आणि मंत्री-संत्र्यांपर्यंत बांडे ह्यांचे ऋणाणुबंध होते, त्यांच्यासाठी बांडे कुटुंबीयांनी नको तेवढ्या खस्ता खाल्ल्या, नको ते सारं काही केलं. 

मुळात बांडे बाबा समाजप्रेमी असल्याने त्यांना ह्या सर्व बाबींचे काहीच वाटत नव्हते. त्यांच्या ह्या समाजप्रेमी स्वभावाच्या आड त्यांच्या सौभाग्यवती कासाबाई कधीच आल्या नाहीत. ना कोणाचा राग केला, ना कुरकुर. त्या अन्नपूर्णाने आपले हात दुसऱ्याला दोन घास खाऊ घालण्यातच झिजविले. येणाऱ्या पाहुण्याचे हसतमुखाने स्वागत करणे, त्यांच्या चहापाणानाची, निवासाची आणि जेवणाचीही सोय बघणे. हे बांडे कुटुंबीयांनी अव्यहातपणे जपले होते. आपण केलेल्या कामाकडे कधीही वळून पाहिले नाही, ना कसली अपेक्षा केली नाही. लोक चांगले म्हणतात की वाईट. त्याचीही पर्वा कधी केली नाही. तर सतत समाजातील लहान-मोठ्यांच्या उपयोगी पडण्याचा छंद त्यांना जडला आणि तो त्यांनी तब्बल ३०-३५ वर्षे आनंदाने केवळ समाजप्रेमापोटी जोपासला.असा हा एक साधा, पण समाजलोभी माणूस पदरमोड करून माणसांना जवळ करण्याचे, त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम करतो आहे. ह्यासामान्य रखवालदाराकडे काही माणसांची कोणत्या बरे! कामासाठी गर्दी होते, रीघ लागते, 

असे आकाशवाणीच्या इतर कर्मचाऱ्यांपासून थेट संचालकांपर्यंत आश्चर्य व्यक्त केले जाई. एक दिवस न राहून संचालक भोसले साहेब बांडे ह्यांच्या घरीच गेले. साहेबांना पाहून बांडे ह्यांची धावपळ उडाली, मात्र त्यांना दिलासा देत भोसले साहेब म्हणाले, "घाबरू नको मारूती, मी तुझ्या घरी फक्त पाणी पिण्यासाठी आलो आहे, आणि मला तुझ्याकडे इतके लोक का येतात हे जाणून घ्यायचे आहे." हे बांडे ह्यांना समजल्यावर फार आनंद झाला, आणि त्यांनी सारे काही कथन केले. आकाशवाणीचे दुसरे संचालक, सावदेकरांचाही असाच अनुभव आहे.त्यांनीही आवर्जून बांडे ह्यांच्या घराला भेट दिली होती. ही साध्या रखवालदाराच्या समाजप्रेमाची पावतीच म्हणावी लागेल.त्याकाळी संपूर्ण शिवाजीनगर परिसरात एकही हॉटेल वा साधी चहाची टपरीही नव्हती. त्यामुळे मारूती बांडे ह्यांनी संपूर्ण आकाशवाणी सेवकांना चहा पुरवण्याची जोखीम घेतली होती, आणि ते काम तेवढ्याच तत्परतेने करत होते. एवढेच नव्हे तर ते एक छोटी घरगुती खानावळही चालवत होते. 

आपल्याकडे येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांचे खानावळीचे पैसे ते भरत असत. एकेकाळी महाराष्ट्र विधानसभा गाजविणारे यशवंतराव भांगरे, कॉ.बी. के. देशमुख, शंकरराव पोटींदे, कृष्णराव मुंढे ही सर्व मंडळी बांडे ह्यांच्या खोलीवर बसून समाजाच्या जडणघडणीची कितीतरी खलबते करतअसत, आणि शेवटी चर्चेनंतर बांडे ह्यांच्या घरीच सुग्रास जेवणाचा आस्वादही घेत असत. एक मात्र खरे, ज्यांनी आदिवासी बांधवांचा उद्दार केला,दिशाहीन झालेल्या आणि आसरा नसलेल्या विद्यार्थ्यांना ज्यांनी मायेचा आश्रय दिला, ज्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना आपुलकीने सांभाळले ती सर्व मंडळी कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर तर कुणी सुपर क्लासवन झाले.

त्यांच्यासाठी बांडे हे ऑफिसरांचे आश्रयपीठच होते. ह्या आश्रीत माणसांतूनकुणी आमदार, खासदार, मंत्री झाले. त्यांनी अनेकांना 'आदिवासी सेवक'ही शासनाच्या दरबारातील खिरापत वाटली. परंतु ज्यांच्या हाताखालूनतयार झालेले चेले अशा चेल्यांनी मात्र बांडे ह्यांना ह्या पुरस्कारापासूनठेवले. ज्यांचा खऱ्या अर्थाने अधिकार होता अशांनाच खड्यासारखे उचलून बाजूला ठेवले. ह्या आठवणीत बांडे जातात आणि खंत व्यक्त करताना म्हणतात, "आम्ही केले ते समाजाच्या हितासाठी, परंतु आज असा समाजाच आमच्याकडे पाठ फिरवतो. आज कुणीही साधे दोन शब्द बोलायला येत नाहीत, म्हणून वाईट वाटते. ज्या दिवशी चालणे संपेल, बोलणे संपेल त्यादिवशी आपण सारे काही येथेच ठेऊन जाऊ, आणि म्हणून आता दुःख करत बसण्याची वेळ राहिली नाही.' आज मात्र बांडे ह्यांना कोणतेही अपत्य नसल्याने त्यांच्या पालन-पोषणाचा प्रश्न ऐरणीवर असताना त्यांचे नातलग त्यांच्या मालमत्तेवर डोळा ठेऊन आहेत. कधी हा संपेल, अशी आशा व्यक्त केली जाते. कुणाचे काय तर कुणाचे काय, असो हे असे असले तरी समाजाने पुण्यातल्या येथे एका छोटेशा खोलीत राहणाऱ्या बांडे कुटुंबीयांना विसरून चालणार नाही. तो समाजाचा कृतघ्नपणा ठरेल. म्हणूनच ह्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य लाभो, हीच सदिच्छा!