काही दिवसानंतर प्रधानाने एक नवीन घर बांधण्याचे ठरविले. त्याने काही मजुरांना हे काम हाती घेण्यास सांगितले. मजुरांनी विचारले, 'तुम्ही आम्हास किती मजुरी द्याल ?' प्रधानाने उत्तर दिले, 'नेहमीची मजुरी.' मजूर जोराने ओरडले, 'आम्ही का म्हणून काम करावे ? आम्ही आमच्या परीने श्रीमंत आहोत आणि आम्ही सर्व समान आहोत.'
ही गोष्ट घरोघर पसरली. प्रधानाला आपली विचार करण्याची दिशा चुकीची आहे असे आढळून आले. सर्व लोकांत समानता निर्माण करण्यासंबंधी त्याने केलेली चूक फार मोठी होती. ह्यासंबंधी काढलेले आदेश रद्द करण्यात येऊन असमानता पुन्हा प्रस्थापित करण्यात आली. जग असमानतेशिवाय चालू शकणार नाही. सेवा करण्यास व सेवा मागण्यास लोक असले पाहिजेत.