मृत्यू ही अटळ घटना (Death is an inevitable event)

Tribal Mahavikas

मृत्यूचा व्यापक अर्थ खालील अठरा ओळींतील गाण्यात सामावलेला आहे. ह्या गाण्यांत नेहमीची गोष्ट नसून त्यातील ओळींत सामान्य विधाने आहेत.

"बोलताना अगर चालतानाही मनुष्याला मृत्यू येईल
सामानाने भरलेली गाडीही उलटी होईल.
निर्दय शब्दाने सख्खा भाऊही ठार होईल
बोलताना अगर चालतांनाही स्त्रीचा मृत्यू घडेल.
स्री गरोदर आहे.
तिच्या मृत्यूची वेळ येईल
मनुष्य झाडावर चढत आहे.
त्याचे हात व पाय निसटले
अग्नीमुळे लाख वितळली
शेपूचा बुंधा वाळून गेला.
लहान वेलीवरून फूल तोडतात
लहान भाजीपाल्याचे झुडूप वाळून जाते.
अशा तऱ्हेने शरीर वाळते
एकाएकी पूर्ण चंद्रोदय होतो.
केळीचा खांब मध्येच मोडतो
मातीचे कच्चे भांडे फुटून जाते.
मातीचे भांडे काही दिवस टिकू शकेल
परंतु शरीर केव्हाही मृत्यू पावेल ह्याच्याबद्दल सांगता येत नाही."

ह्या सर्व ओळींत अर्थ भरला आहे. वारल्यांच्या शेतीविषयक जीवनातून ही सर्व उदाहरणे निवडली आहेत. पूर्ण चंद्र उगवणे व मातीचे भांडे फुटणे ह्यासारख्या कल्पना काव्यमय पद्धतीने मांडल्या आहेत.