स्त्रीची शुद्धता (Chastity of woman)

Tribal Mahavikas


'एका राजाकडे सोन्याचा भारी वजनाचा मुकुट होता व तो फक्त शुद्ध खीच उचलू शकत असे. एके दिवशी राजाने आपल्या प्रधानाला विचारले, 'आपल्या राज्यात अशी शुद्ध स्त्री आहे का की जी हा मुकुट उचलून राजवाड्याच्या शिखरावर नेऊन ठेवील ?' प्रधानाने उत्तर दिले 'होय. अशी एक स्त्री आहे की जी ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल.' प्रधानाच्या मनात आपली पत्नी होती की जी हे कठीण काम करू शकेल. राजाने त्याला धोक्याची सूचना दिली, 'जर ह्या स्त्रीने हा मुकुट उचलून राजवाड्याच्या शिखरावर नेला नाही तर तुझे मुंडके उडविले जाईल. जर तिने मुकुट उचलला तर माझे अर्धे राज्य तुला दिले जाईल.' प्रधानाने राजाचे आव्हान स्वीकारले कारण त्याला आपल्या पत्नीच्या शुद्धतेबद्दल विश्वास होता. त्याने आपल्या वृद्ध आईला आपली योजना उघड केली व सांगितले की आपण आपल्या पत्नीला ह्या सर्व       प्रकरणाबद्दल विचारणार आहोत. वृद्ध आईने मात्र त्याची पत्नी खरोखर शुद्ध आहे का ह्याचीखात्री करून घेण्यास सांगितले. तिने मुलाला सांगितले की तू एका वेगळ्या मार्गाने आपल्या पत्नीची परीक्षा कर. आईच्या सूचनेप्रमाणे प्रधानाने आपल्या पत्नीपुढे ही योजनामांडली. तो तिला म्हणाला, 'प्रिये, राजाकडे एक मुकुट आहे. ज्या स्त्रीचे पाच पुरुषांबरोबरसंबंध होते अशीच स्त्री हा मुकुट उचलू शकेल. जर हा मुकुट उचलला तर त्या स्त्रीला अर्धे  राज्य मिळेल.' पत्नीने त्वरित सर्व गुपित खुले केले व ती त्याला म्हणाली, 'फक्त एक माणूस कमी आहे. माझे चार पुरुषांबरोबर संबंध होते.                                                   

मी पाचव्याशी संबंध जोडीपर्यंत तू थांबू शकणार नाहीस का?' 'हे गुपित फुटले. त्याच्या आईला आपल्या मुलाबद्दल फार काळजी वाटू लागली कारण त्याची पत्नी मुकुट उचलू शकणार नव्हती. त्याची आई मात्र शुद्ध होती. ती पुढे गेली व फूल उचलावे अशा तऱ्हेने तो मुकुट अगदी सहजगत्या उचलला. राजवाड्याच्या अगदी शिखराजवळ तिने तो उचलून आणला परंतु त्यावेळी तिला तो जड वाटू लागला. तिने देवापुढे कबूल केले, 'माझ्या जीवनात असा एक क्षण आला असावा की ज्यावेळी माझ्या पतीव्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाचा विचार आला असावा. परंतु तो फक्त विचार होता. मी कृती करण्यात कोणतीच चूक केलेली नाही. त्याबरोबर मुकुट हलका झाला व प्रधानाच्या आईने तो खरावर नेऊन ठेवला.

ह्या गोष्टीची मूळ निर्मिती वारल्यांची असेल असे वाटत नाही. गोष्टी सांगणाऱ्या माणसाने मूळ गोष्टीवर मुलामा चढवून ह्या गोष्टी तयार केल्या आहेत.