गाणे अर्थपूर्ण व्हावे ह्यासाठी प्रयत्न केला जातो. जर गाणे लांब असेल किंवा त्यातील शब्द जसेच्या तसे घेतल्यास ते तुलनात्मक दृष्ट्या लहान असले तर
गाण्याचा अर्थ बदलणार नाही ह्याची काळजी घेतली जाते. जर जरुरी असेल
तर गाण्याच्या अखेरीस काही टीकात्मक शेरेही मारले जातात.
धवलेरी विवाह विधीत जी गाणी म्हणते त्या गाण्यांना इतर स्त्रिया म्हणत असलेल्या सर्वसामान्य गाण्यांपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. धवलेरी म्हणत असलेल्या गाण्यांमधे वाडूनिश्चयापासून प्रत्यक्ष विवाहापर्यंत तसेच
गरोदरपणापासून प्रसूतीकालापर्यंतचे सर्व प्रसंग अंतर्भूत
असतात. त्यांच्या कल्पनेप्रमाणे विवाहाचे हे सर्व नैसर्गिक
टप्पे आहेत.
हिंदूंच्या विवाहाप्रमाणे वारल्यांनाही वाजंत्री, पुरोहित आणि सुवासिनींची
जरुरी भासते. गाण्यामधील स्त्रीच्या पोशाखासंबंधीचे वर्णन मोठे
मजेशीर आहे. हे वर्णन वारली स्त्रीचे नसून जुन्या
काळातील हिंदूंच्या उच्च जातीतील स्त्रीच्या आदर्श पेहरावासंबंधीचे
आहे. देवतांचे कुंकू हे गोल आकाराचे नसून ते आडव्या रेषेत असते चिरी. जर कुंकू लावायचे असलेच तर वारली स्त्रिया ते लांबट रेषेचे लावत नसून
गोल आकाराचे लावतात. वारली स्त्रियांमध्ये भांगात शेंदूर
घालण्याची पद्धत फक्त लग्नासारख्या समारंभातच अनुसरली जाते. विवाहाच्या गाण्यांत
वधूचा कुठेच उल्लेख नसतो. मात्र
प्रत्येक गाण्यांत वराच्या सन्मानाचे वर्णन असते.