उंबराचे गाणे - Umbra's song

Tribal Mahavikas

उंबराची फांदी कापत असताना म्हणावयाचे गाणे -

तेलुबाई मृत पावली
त्या जागी उंबर जन्मले
उंबर धरतीच्या बाहेर आले
उंबर त्याच्या मुखातून, बियातून बाहेर पडले
उंबराला दोन कोवळी पाने फुटली
उंबर वाढू लागले
त्याच्यावर पाऊस पडला
वाऱ्याच्या झुळकेबरोबर वाढू लागला.
त्याला चार पाने फुटली
त्याला आठ पाने फुटली
एक फांदी पूर्वेकडे गेली तर दुसरी पश्चिमेकडे
एक उत्तरेच्या दिशेने पसरली तेथून इसर देव आला
गंगागौरीही आली
गंगागौरी बोलू लागली
हा उंबर फार सुंदर आहे
ह्या उंबराचा उपयोग देवाच्या विवाहासाठी होईल
त्यांनी पवित्र दोरा आणला
पूर्वेकडील फांदीभोवती त्यांनी दोरा गुंडाळला
इसर देवाने तो कापला
गंगागौरीने तो पकडला

धवलेरी हे गाणे उंबराची फांदी कापताना म्हणते. उंबराचे झाड वारली पवित्र मानतात. कारण विवाहाच्या विधीत त्याची जरुरी भासते. ह्या गाण्यात उंबराच्या झाडाची उत्पत्ती कशी झाली हे सांगितले आहे. इसरदेव आणि गंगागौरी जिचे आधीच्या गाण्यात गरजाई म्हणून वर्णन केले आहे त्याचा उल्लेख ह्या गाण्यातही आला आहे. परंतु येथे गंगा आणि गौरी एकत्रित केल्या आहेत. वारल्यांना गंगा ही शिवाची पत्नी वाटत असावी. वारल्यांच्या विवाहात वर उंबराची फांदी कापतो व वधू ती पकडते.