आदिवासी कायदयाचे स्वरुप (Nature of Tribal Law)

Tribal Mahavikas

१) अलिखीत कायदा - आदिम जमातीत कायदयाचे स्वरुप अलिखित आहे. प्रगत समाजातील कायदयाप्रमाणे संविधानात्मक तरतुदी किंवा लिखित स्वरुप नाही. आदिम जमातीत प्रथा, परंपरेचे, लोकनितीचे पालन करीत असतात लिखीत पुरावे नसतांना सूद्धा एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित केल्या जातात. जे जमातीमधील सदस्य प्रथा, परंपरेचे पालन करीत नाही त्यांच्यावर देवीचा कोप होतो अशी धारणा आहे.

२) लोकमत - आदिम कायदयाचा प्रमुख आधार लोकमत असून लोकमतामुळेच आदिम कायदयाचे अस्तित्व टिकून आहे. आदिम जमातीतील मूल्याची अवहेलना कोणीही आदिम सदस्य करु शकत नाही. लोकांची नितीमूल्याप्रती असलेल्या भावनेचा आदर करावा लागतो. आदिम लघुसमूह असल्यामुळे समाजामध्ये घडणाऱ्या घटना सर्वांना परीचित असतात. एकमेकांशी असलेली जिव्हाळ्याचे संबंध त्यामुळे लोकमतला महत्त्व आहे. जमातीमधील जेष्ठ सदस्याने सर्वानुमते घेतलेला निर्णय अंतीम असतो. जमातीने आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर बहिष्कार घालू नये याची खबरदारी घेतल्या जाते. लोकमतचा विरोध कोणीही करीत नाही. लोकमतचा आदर करावा लागतो.

३) फौजदारी स्वरुप - सभ्य समाजामध्ये दोन प्रकारे अपराधाचे प्रकार आहेत. फौजदारी आणि दिवानी, फौजदारी गुन्ह्यांमध्ये हिंसाचार, मारामारी, खून, डकैती इ. आदिम जमातीत कायदयाचे दिवानी स्वरुप नसून फौजदारी कायदयाचे अस्तित्व आहे. आदिम जमातीमधील काही अंशी वातावरण हिंसक असल्यामुळे फौजदारी कायदा बहुतांश आढळतो. जमातीमधील सदस्याने अपराध केल्यास वेळप्रसंगी शिक्षा ही शारिरीक स्वरुपाची असते. झाडाला बांधून आसूड गुन्हेगाराच्या शरीरावर ओढणे, मारहाण करणे, लोखंडी तापलेल्या सळीने मारणे इ. शिक्षा केल्या जाते.

४) आप्तसंबंध - कायदयाच्या दृष्टीने आप्तसंबंधांना फार महत्त्व आहे. अपराध करणारा जरी एकटा असला तरी जबाबदार गुन्हेगाराच्या कुटुंबास ठरविल्या जाते. वेळप्रसंगी गुन्हेगार पळून गेल्यास किंवा पंचायतीसमोर न आल्यास शिक्षा कुटुंब सदस्यांना केल्या जाते. वेळप्रसंगी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येतो. गुन्हेगाराचे वडील, आई, बहिन, भाऊ यांना सुद्धा शिक्षा ठोठावण्यात येते.

५) सामुहिक जवाबदारी - कायदयाचे पालन करणे हि एकट्या व्यक्तीची जबाबदारी नसून सामुहिकरीत्या पार पाडल्या जाते. कुटुंब, कुल, शेजारी, जमातीमधील सदस्य, गावातील नागरीक संरक्षणाची जबाबदारी पार पाडीत असते. गुन्ह्याची शिक्षा देण्याची जबाबदारी हि सामुहिकरीत्या पार पाडली जाते. गुन्हेगारास गुन्हेगार हा पळून जाऊन नये म्हणून त्याच्यावर नजर ठेवल्या जाते किंवा शासन झालेच पाहिजे, या संकल्पनेने समुहाची भूमिका महत्त्वाची असते. समुह कायदयाच्या पैलूचे सर्व बारकावे लक्षात ठेवत असतो.

६) अपराधाच्या उद्देशाकडे दुर्लक्ष - सभ्य समाजामध्ये गुन्ह्याच्या स्वरुपाची परताळणी करीत असतांना गुन्हेगाराच्या गुन्ह्याच्या उद्देशाची चाचपणी केल्या जाते. अपराध कोणत्या उद्देशाने केला? पराधामागील पार्श्वभूमी? या बाबींचा विचार करुन अपराध्यास शिक्षा ठोठावण्यात येते परंतु आदिम जमातीमध्ये अपराधाच्या उद्देशाकडे दुर्लक्ष केल्या जात असून अपराध घडला हि बाब महत्त्वाची धरुन शिक्षा केल्या जाते. अपराधामागील हेतू कोणीही लक्षात घेत नाही किंवा आरोपीला गुन्ह्याचा उद्देश विचारला जात नाही. जेव्हा केव्हा गुन्हा जरी कळत नकळत घडला किंवा अनावधानाने घडला तरी गुन्हेगारास शिक्षा केल्या जाते. आदिम अपराधामागे नैतिक उद्देश लक्षात घेतला जात नाही. गुन्हेगारास शिक्षा केलीच जाते. अर्थात बदला घेण्याची हि जमात मान्य पद्धत आहे.

7) न्यायदान - आदिम कायदा व कायदयाच्या स्वरुपाचा अभ्यास केल्यानंतर गुन्हेगाराला देण्यात येणारी शिक्षा कोणत्या संस्थेमार्फत होते? असा प्रश्न पडतो, जमातीमधील प्रथा, परंपरा यांचे काटेकोरपणे पालन केल्या जाते. यात शंका नाही. जमातीमध्ये राहत असतांना जमातीमधील सदस्यांचे गैरवर्तन खपवून घेत नाही, परंतु गुन्हेगारास शासन करण्याचे किंवा देण्याचे काम न्यायव्यवस्था करते. आरोप सिद्ध झाल्यास शिक्षा होते किंवा फिर्यादीस न्याय मागण्याचा अधिकार न्याय व्यवस्थेकडे आहे. न्यायव्यवस्था न्यायदान करुन आरोपीस शिक्षा करते फियादीस न्याय मिळतो. आदिमांच्या न्यायदान पद्धतीचे स्वरुप विचारात घेतांना खालील गोष्टीचा समावेश करणे अगत्याचे वाटते. समाजातील आचारसंहिता, नियमांचे पालन करणे प्रत्येक सदस्यांचे नैतिक जबाबदारी आहे. या जबाबदारीतून सदस्य पळवाट काढू नये किंवा कायदयाची अंमलबजावणी प्रत्येकाने करणे गरजेचे असते.या सर्व बार्बीवर निमंत्रण ठेवण्याचे काम समाजातील न्याय व्यवस्था करते.