अर्थव्यवस्थेचा अर्थ - Meaning of Economic System

Tribal Mahavikas

मानवाला भूक आहे म्हणून श्रम आहे असे म्हणने वावगे होणार नाही. भूक शमविण्याकरीता कष्ट करावे लागते. कष्टाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून भूक मिटविण्याकरीता अन्न खरेदी करतो. वेळप्रसंगी साधनांची व इतरांची मदत घेतो. हिच व्यवस्था टिकविणारे क्रिया म्हणजे आर्थिक व्यवस्था होय.

१. राल्फ पिडिंग्टन (Ralph Piddington) - "मानव आपल्या भौगोलिक गरजा पूर्ण करण्याकरीता उत्पादनाचे संघटन, विवरणावर नियंत्रण तसेच समुदायातील स्वामित्व व अधिकाराचे निर्धारण करणाऱ्या पद्धतीत अर्थव्यवस्था म्हणतात."

२. डॉ. मजुमदार व मदन (Dr Manjumdar and Madan) - "मानवी जीवनातील दैनंदिन महत्तम गरजा भागविण्याकरीता क्रमबद्धरीत्या संघटित व विकसीत केलेल्या कमीत कमी प्रयत्नांच्या व्यवस्थेस आर्थिक संघटन म्हणतात.

३. बिल्स व होईजर (Beals and Hoijer)- "उपभोग्य वस्तू उत्पादन, वितरण आणि नियंत्रण करणाऱ्या व्यवस्थेस आर्थिक व्यवस्था म्हणतात.
वरील व्याख्येवरुन असे निदर्शनास येते की मानवाने आपल्या जीवनातील गरजा भागविण्याकरीता उत्पादन, विनिमय उपभोगाच्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था म्हणतात. आदिवासी समाजातील अर्थव्यवस्था ते वास्तव्य करीत असलेल्या दऱ्याखोऱ्याच्या भौगोलिक परीस्थितीवर अवलंबून असते. काही आदिवासी प्रामुख्याने शिकारीवर आपला उदरनिर्वाह करतात तर काही डोंगराळ प्रदेशात शेती करतात तर काही वन्य संपत्ती जमा करतात. आदिवासींच्या अर्थव्यवस्थेत काळानुसार बदल झालेला आढळून येतो. प्राचीन काळातील अर्थार्जन आणि सध्याच्या युगातील अर्थव्यवस्थेत फरक जाणवतो. प्रगत समाज आदिवासींच्या संपर्कात आल्यामुळे मूळ अर्थव्यवस्था बदलली. केवळ उदरनिर्वाहापूरतीच मर्यादीत असलेली अर्थव्यवस्था मात्र पैशाच्या चलनामुळे बदलली आहे.