दागिन्यांची गाणी Jewel Songs

Tribal Mahavikas

नवरदेवाने तेथे स्नान केले

ह्या बाजूने कुठला नवरदेव गेला ?

ह्या बाजूने रामजी नवरदेव गेला

तो लांबून पाहात होता

हे मुला, तू कशासाठी आलास?

म्हणून त्याने त्याला विचारले,

मी दागिने घेण्यासाठी आलो

ते मी पाच दिवस अंगावर घालेन व परत करेन

उसने घेईन व परत करेन

पाच दिवसांनी ते मी परत करेन

दागिने घाला, दागिने घाला

दागिने घातले

त्याच्या बोटात दागिने घाला

त्याच्या गुडघ्यावर दागिने घाला

त्याच्या हातावर व कमरेवर,

त्याच्या छातीवर, डोक्यावर व चेहऱ्यावर,

शरीराच्या सर्व भागावर दागिने घाला

शरीर रक्तमांसापासून बनलेले आहे

शरीर उणिवा व दोषाने भरलेले आहे

जेव्हा नवरदेव स्नान करतो व देवविधी करण्यासाठी बसतो त्यावेळी धवलेरी हे गाणे म्हणते. विवाह विधीच्या वेळेस नवरदेव बहुदा त्याच्या बोटात चांदीची आंगठी घालतो आणि कमरेस चांदीची साखळी बांधतो. हे दागिने त्याला त्यांच्या जमातीमधील अथवा हिंदू जातीतील कुणाकडून तरी उसने घ्यावे लागतात. गाण्याच्या पहिल्या अर्ध्या भागात ह्या उसनवारी संबंधीचे वर्णन आहे तर दुसऱ्या भागात शरिराच्या वेगवेगळ्या भागांचे वर्णन असून प्रत्येक भाग दागिन्यांनी कसा सजवावा ह्यविषयी वर्णन आले आहे.