आदिम जमातीमध्ये न्यायदान व्यवस्था स्वरूप (Form of justice system in primitive tribe)

Tribal Mahavikas

आदिम जमातीमध्ये न्यायदान देण्याचे काम पुढील बाबीवर अवलंबून आहे:-
१. पंचायत २. आरोप सिद्ध करण्याची पद्धत ३. शिक्षा किंवा दंड

१) पंचायत - आदिम जमातीमध्ये कायदयाचे अस्तित्व टिकवून ठेवणारी पंचायत एक सामाजिक संघटन आहे. कोणताही अपराध जमातीमध्ये घडल्यास पंचायतद्वारा न्यायदानाचे कार्य केल्या जाते. यालाच जमात पंचायत सुद्धा म्हणतात जमात पंचायतमध्ये प्रौढ नागरीक, जमातीतील मान्यवर, धार्मिक गुरु इ. चा समावेश असतो. विवाह विषयक समस्या, शेतीचा वाद किंवा शेजान्या सोबतचे भांडण इ. वाद सोडविण्याचा प्रयत्न पंचायतीमार्फत केल्या जातो. कोलाम जमातीमध्ये घटस्फोट घेण्याची प्रथा पंचायतीमार्फत आहे. नवरा बायकोचा घटस्फोट झाल्यानंतर पंचायतीच्या सदस्यांना मद्य प्राशन करण्याकरीता दिले जाते.
पंचायत हे आदिम जमातीमधील न्यायदानाचे मंडळ आहे. या व्यवस्थापन मंडळास जमातीनुसार वेगवेगळी नावे आहेत. कमार जमातीमध्ये ग्रामपंचायत संबोधण्यात येते तर बहुतांश आदिम जमातीमध्ये प्रामुख्याने 'पंचायत' म्हणूनच ओळख आहे.
पंचायतीमध्ये विविध प्रकारे वाद किंवा गुन्हे येतात. त्याचा न्यायनिवाडा करण्याचे काम पंचायतीचे आहे.

पंचायतीचे कार्ये :
१) जमात व्यवस्था टिकविणे.
२) जमातीच्या नियमांचे पालन करणे.
३) जमातीमधील वाद-संघर्ष मिटविणे.
४) गुन्हेगाराचे आरोप सिद्ध करणे
५) गुन्हेगारास योग्य शिक्षा देणे.
६) गुन्ह्याची पुनरावृत्ती न करण्याची खबरदारी घेणे.
७) कौटुंबिक कलह नाहिसा करणे
८) नियमबाह्य वैषयीक संबंधावर अंकूश लावणे.

२) आरोप सिद्ध करण्याची पद्धती - गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्याची कबूली करणे आवश्यक असते, त्यावेळी त्याचा जाब न नोंदविता शपथ घेणे, दिव्य करणे इ. केले जाते.
अ) शपथ घेणे - आरोपी शिक्षेला घाबरुन खोटे बोलू नये किंवा कोणतीही पळवाट काढू नये, तसेच त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत किंवा कृत्याबाबत खरी माहिती देण्याकरीता आरोपीस बाध्य केल्या जाते. प्रामुख्याने आदिम जमातीमध्ये खोटी शपथ घेत नाही. अलौकिक शक्ती किंवा आपल्या कुलदेवतांची साक्ष ठेवून शपथ घेण्यास सांगते. आपला गुन्हा कबूल न केल्यास काय होईल या भितीने गुन्ह्याची पार्श्वभूमी सांगून आरोपी गुन्हा कबूल करतो. काही जमातीमध्ये आरोपीच्या शरीराला देवीचा अंगारा लावून गुन्ह्याची माहिती मिळविल्या जाते. काही जमातीमध्ये अग्नी, सूर्य यांची नावे घेवून शपथ घेतात.

ब) दिव्य करणे - गुन्हेगारास आपल्या गुन्ह्याचे निर्दोषत्व सिद्ध करण्याकरीता परीक्षा दयावी लागते. अवघड अशा दिव्यातून जावे लागते. आपल्यावरील असलेली आरोप निर्दोष असावे याकरीता बहुतांश आदिवासींमध्ये वेगवेगळ्या अवघड लागते. परीक्षा घेतल्या जातात. अपराधाचा स्विकार करावा लागतो, अन्यथा दिव्य करावे

आरोपीला आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याकरीता अनेक परीक्षा दयावा लागतात.
१. उकळत्या पाण्यात हात घालणे.
२. तापलेल्या नांगराचा काळ हातात घेवून बसविणे.
३. जिभेला टोचून देणे.

वरील प्रकारच्या परीक्षा देतांना आरोपीस वेदना किंवा जखम झाल्यास आरोपी म्हणून सिद्ध होते. अशाप्रकारे दिव्य केल्या जाते.

३) शिक्षेचे स्वरुप - निदोषत्व सिद्ध न झाल्यास गुन्हेगाराच्या शिक्षेचे स्वरुप गुन्ह्याला समोर ठेवून होते. शिक्षा पंचायत ठरविते. शिक्षेचे स्वरुप शारीरीक व मानसिक असते. मात्र शाररीक शिक्षा अघोरी असते.

१) गुन्हेगारास चाबकाने मारणे.
२) हातपायास इजा करणे,
३) कुटुंबावर बहिष्कार घालणे
४) गावामधून आरोपीची धिंड काढणे
५) याशिवाय आर्थिक दंड म्हणून पैशाच्या रुपात भरपाई करावी लागते.

आदिवासी आपला कोणताही वाद न्ययालयात जाऊ न देता जमातीमधील पंचायतीमध्येच आपला न्याय-निवडा करतात. पंचायतीमध्ये आलेले वादी-प्रतिवादी हे जवळजवळ परीचित असतेच तसेच त्याच्या गुन्ह्याबाबत बरीचशी माहिती पंचायतीला असते. आदिम हा लघुसमूह आहे. गावामध्ये असलेली लोकसंख्या काही प्रमाणात असल्यामुळे गावामधील घडणाऱ्या घटना सहजरीत्या गावातील नागरीकांना माहित असतेच.

👇पंचायतीसमोर येणारे वाद
१) नवरा बायकोचा घटस्फोट
२) दोन भावंडातील भांडणे
३) विवाह बाह्य संबंधाची सिद्धता
४) दोन कुटुंबातील वाद
५) शेजारा- शेजाऱ्याचा वाद
६) शेतीविषयक वाद
७) वैषयीक गुन्हे किंवा बलात्कार
८) दुसऱ्या स्त्रिस किंवा दुसऱ्याच्या बायकोला पळवून नेणे
९) खून
१०) जाळपोळ
११) जादूटोणा करणे

अशाप्रकारे पंचायत आदिम जमातीमधील न्यायदान करणारी संस्था असून पुढीलप्रमाणे विशेष आढळून येते.

१) पक्षभेद न करता सर्वांना समान न्याय - पंचायतीचे न्यायदान त्यापैकी पक्षपात केल्या जात नाही. गुन्हेगारीच स्वरुप कोणतेही योग्यरीत्या असून असो शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हेगार पंचायतीच्या जवळचा असो वा दुरचा त्याला शिक्षा दिल्या जाते.

२) विलंब न लावता निर्णय - पंचायतीच्या निर्णयास विलंब लागत नाही. वादी फिर्यादी न्याय मागण्याकरीता पंचायतीकडे आल्यानंतर न्यायनिवाडा त्वरीत केल्या जातो. कोणतेही प्रकरण प्रलंबित ठेवल्या जात नाही.

३) साधा आणि सोपा निवाडा - पंचायतीमध्ये न्यायादान करण्याची पद्धत अत्यंत साधी आहे. पंचायत भरविण्यापूर्वी पंचायतीची सूचना किंवा माहिती गावकरी मंडळींना दिली जाते. पंचायतीमध्ये येणारा वाद बहुतांश पंचायतीच्या सदस्यांना माहित असतो. पंचायतीने केलेला निवाडा मान्य करावयाचा असतो. पंचायतीचा निवाडा गुंतागुंतीचा नसून सोपा असतो.

४) न्यायदान करतांना धार्मिक आधार - पंचायत न्यायदान करीत असतांना धार्मिक आधार घेते. आरोपीने विलंब न लावता आरोप मान्य करावे याकरीता अलौकिक शक्ती किंवा देवदेवतांची शपथ घेण्यास सांगते