आदिम अर्थव्यवस्था - Economic system of Tribal
January 27, 2023
मानव आपल्या गरजांची पूर्ती करण्याकरीता सतत प्रयत्न करतो. मूलभूत गरजांची पूर्तता करण्याकरीता मनुष्य सतत धडपड करीत असतो. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या अत्यंत महत्त्वाच्या प्राथमिक गरजा असून अन्न नसेल तर माणूस जीवंत राहू शकत नाही. वस्त्रामुळे पूर्ण शरीर झाकल्या जाते तर निवाऱ्यामुळे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होवून निवांत जीवन जगण्याची जागा म्हणजे निवारा होय. अन्न, वस्त्र, निवारा माणसाला आपोआप प्राप्त होत नाही, त्याकरीता कष्टाची गरज आहे. मनुष्य या गरजा एकटा पूर्ण करु शकत नाही तर सहकार्याची आवश्यकता असते. आर्थिक क्रिया महत्त्वाची आहे. आर्थिक व्यवस्था भौगोलीक रचनेवर अवलंबून आहे. समाज कोणताही असो, आदिवासी वा सभ्य अर्थाजन आवश्यक आहे. आदिवासींमध्ये असलेली आर्थिक व्यवस्था अत्यंत साधी व सरळ आहे. गुंतागुंतीची मात्र नाही, आदिवासी माणूस मुलभूत गरजा पूर्ण करण्याकरीता सतत धडपड करीत असतो. माणसाच्या गरजा भरपूर आहेत. माणूस प्राचीन काळापासून अर्थाजन करीत आहे. परंतु अर्थव्यवस्थेची संकल्पना हि प्रत्येक युगात बदललेली दिसते. अर्थव्यवस्थेचा प्रभाव आदिम जीवनावर होत असते. जेवढी अर्थव्यवस्था संपन्न तेवढी समाज व्यवस्था संपन्न होते.
आदिमांच्या अर्थव्यवस्थेचा परीणाम त्यांच्यावर दिसतो. प्रत्येक वस्तूंचा विनिमय केला जातो. त्याचकरीता अर्थव्यवस्था असते. आदिवासींच्या अर्थव्यवस्थेचे स्वरुप लक्षात घेता असे निदर्शनास येते की, खरोखर प्राचीन युगात आदिवासी अर्थव्यवस्था अस्तित्वात होती का? हा प्रश्न निर्माण होतो. कदाचित याचे उत्तर प्रत्येक आपापल्या कुवतीने देईन. केवळ अन्न संकलने करणे व त्यावर उदरनिर्वाह करणे याला अर्थव्यवस्था म्हणता येणार नाही, तर अन्नाचा शोध, संकलन, त्याकरीता तांत्रीक साधनांचा उपयोग, परस्परांचे सहकार्य इ. बाबींचा समावेश आर्थिक व्यवस्थेत केला जातो.
आदिवासी अर्थव्यवस्थेच्या पैलूंचा अभ्यास केल्यास नाविन्यपूर्ण व्यवस्था वाटते. आदिवासींचे आर्थिक जीवन पूर्णतः जंगलावर अवलंबून होते. परंतु वनखात्याचा कायदा व नियमांमुळे आदिवासीची अर्थव्यवस्था जंगलांपासून थोडी दूर गेली परतु पशु-पक्षी, जंगलपक्षी, जंगली जनावरे, वृक्ष, मुळ व फुलांचे संकलन यावर आधारीत अर्थव्यवस्था आहे
Tags