१. अन्न संकलन (Food collection)
२. शिकार व मासेमारी (Hunting and fishing)
३. पशुपालन (Stock Raising)
४. शेती (Cultivation)
५. हस्तव्यवसाय
आदिवासी अर्थव्यवस्थेचे प्रकार अनेक शास्त्रज्ञांनी वर्गीकृत केलेले आहेत.
आदिवासींना अर्थार्जन करतांना प्रथम जंगलात जावे लागते किंवा शेतीचा आधार घ्यावा लागतो. आदिवासी अर्थव्यवस्थेत व्यापारी दृष्टीकोन दिसत नसून व्यापार करीत नाही. आदिवासी अर्थव्यवस्थेचे पुढील सर्वसामान्य प्रकार आढळून येतात.
१. अन्न संकलन (Food Collection)
अन्न संकलन अर्थाजनाची आदिम जमातीमधील आढळून येणारी प्राथमिक क्रिया आहे. प्राचीन काळात अन्न निर्माण करण्याची पद्धत आदिवासींना ज्ञात नव्हती त्यामुळे जंगलातील कंदमुळे, फळे, मध इ. संकलन करुन उदरनिर्वाह करीत असे शिवाय जंगलात मिळणाऱ्या उपयोगी वनस्पती गोळा करीत असे. मोहाफूल गोळा करुन व्यापारास विकतात तर काही आदिवासी मोहाफूलापासून मद्य गाळतात. गाळलेले मद्य स्वतः सेवन करतात. जंगलामध्ये मिळणारी कंदमुळे व फळांची संकलन करण्याकरीता आदिवासींना फार कष्ट घ्यावे लागते. जंगलातील विविध भागात व अतिआतील भागात जाऊन फळे किंवा कंदमुळे शोधावे लागते. अन्न संकलन करीत असतांना जंगलातील हिस्त्र पशूंचा सामना करावा लागतो.आदिवासी अन्न संकलन करतांना गटागटाने जंगलात जातात. मिळालेले अन्न याची सम प्रमाणात वाटणी करुन घरी घेवून येतात.
फळ, मुळे, कंद संकलित करीत असतांना धारधार शास्त्रांचा उपयोग केला जातो. जंगलामध्ये प्रवेश करतांना गटातील प्रत्येक आदिवासी सदस्यांजवळ धारधार शस्त्रे असतात व जेणेकरुन सदस्य एकटा असतांना हिस्त्र पशूंचा हमला झाल्यास तो परत करण्याकरीता शस्त्राची गरज भासते. जंगलामध्ये फळे, मुळे अनेक प्रकारची असतात. मोहफूल, डिंग, मध, तेंदूपत्ता, बांबू हे सुद्धा आदिवासी संग्रहीत करतात.
दक्षिण भारतातील येनाडी, चेंचू, मलपंतरम, कादर, महाराष्ट्रातील भिल्ल, माडिया, गोंड, बिहारमधील बिरहोर जंगलामध्ये जाऊन जंगली संपदा संकलीत करतात. एस्कीमो जमात बोरासारखी फळे गोळा करतात.
२. शिकार (Hunting) –
अन्न संकलनासोबतच आदिवासी जंगलातील प्राण्यांची शिकार करतात. पशुपक्षी, हिरण, रानकोंबडी, ससा, रानडुक्कर, चिमणी, मोर, तितर इ. पशुंची शिकार केली जाते. शिकार करण्याकरीता आदिवासी शस्त्र सोबत घेवून जातात. धनुष्यबाण, कुन्हाड, भाला, तलवार, काठी, कुत्रा सुद्धा सोबत घेवून जातात. सोबत असलेल्या शस्त्रांचा उपयोग शिकार पाहून केल्या जाते. आदिवासी शिकार करतांना त्या कुलाचे देवक प्राणी असतो, त्याची शिकार करणे किंवा मांस खाणे टाळतात. जंगलातील मोठया प्राण्यांची शिकार करतांना समुहाने राहात असतात. एकट्या सदस्यांकडून मोठया प्राण्याची शिकार शक्य नसते, मोठया प्राण्याची शिकार करतांना अत्यंत सावधगीरी बाळगतात. जंगलामध्ये भटकंती करावी लागते. शिकार जंगलातील एकाच ठिकाणी होईल याची शाश्वती नसते. केव्हा केव्हा बरेच दिवस जंगलात फिरुनही शिकार मिळत नाही. मोठया प्राण्यांची शिकार म्हणजे आपत्ती ओढून घेणे होय. शिकार करीत असतांना तंत्रमंत्राचा वापर केला जातो. मोठ्या प्राण्यामध्ये गवा, हिरण, रान म्हैसची शिकार केली जाते.
शिकार करण्यापूर्वी देवदेवतांची, कुळातील देवांची व शस्त्रांची पूजा केली जाते. कर्नाटकामधील आदिवासी हत्तीची शिकार करतात. परंतु अलीकडील काळात कर्नाटकमधील आदिवासी हत्तीच्या शिकारीला वेगळे वळण लागले आहे. शहरातील तस्कर आदिवासींना हाताशी धरुन हत्तीची तस्करी करीत आहे.
३. मासेमारी (Fishing)
मासेमारी हा सुद्धा आदिवासी अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार आहे. आदिवासी वस्तीच्या बाजूने नदी किंवा नाला वाहत असतो. तेथे मासे मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे बहुतांश आदिवासी मासेमारी करतात. मासेमारीवर आपली उपजिवीका करतात, परंतु हा दुय्यम व्यवसाय समजला जातो.
मासेमारी करतांना गटागटाने आदिवासी नदी किंवा नाल्यावर जातात. मासेमारी भरपूर प्रमाणात मिळावे म्हणून नाल्याला किंवा नदीत बांध घालतात मासे पकडण्याकरीता जाळ्यांचा उपयोग करतात. काही आदिवासी धुनष्यबाणाने मासांची शिकार करतात. सामुहिकरीत्या गोळा केलेल्या मासांचे वाटप समप्रमाणात करतात. मासे दररोज जेवणात असते. काही मासे घरांच्या छप्परावर वाळत घालतात. काही दिवसांनी सुकल्यावर भाजी म्हणून मासांचा वापर करतात. आफ्रिकेतील आदिवासी मासांना बाणाने मारतात तर भारतामध्ये काही आदिवासी जमात लोखंडी गळाच्या साहयाने पकडतात.
४. पशुपालन (Paistoralists)
आदिवासींच्या अर्थार्जनामध्ये पशुपालन महत्त्वाचा व्यवसाय आहे. वस्तीभोवताल जंगल असल्यामुळे पशूंना मुबलक वैरण मिळते. पशुपालनाचा निर्वाह जंगलातील वैरणावर होतो. पशुपालनामध्ये दुधदुभते होते.
गाई- म्हशी निसर्गावर उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यावर गुजराण करतात. गाई-म्हशीचे पालन करतांना खर्च होत नाही. आदिवासी कुटुंबातील एखादा सदस्य गाई-म्हशी जंगलामध्ये किंवा शेतीमध्ये चारण्यास नेतो. गाईपासून मिळणारा गोरा बैल म्हणून शेतात कामी येतो. गाई, म्हशी, शेळी बाजारामध्ये विकून पैसा मिळवितात. आदिवासी घोडा, मेंढ्या, कोंबड्या, बदके, कुत्रा इ. प्राणी, पशु सुद्धा पाळतात. कोंबड्यांचे अंडे बाजारामध्ये विकतात. कुत्र्यांचा उपयोग शिकार करण्याकरीता किंवा आपल्या धन्याचे रक्षण करण्याकरीता केला जातो.
वाळवंटातील आदिवासी पाळीव प्राणी म्हणून उंटाचा उपयोग करतात. पशुपालनामध्ये दुध तर मिळतेच पण पशूंचा विस्तार पाहून बाजारामध्ये विक्री केल्या जाते. विक्रीच्या माध्यमातून येणारा पैसा कुटुंबाच्या उपयोगी येतो. आफ्रिकेतील आदिवासी पक्षांचे पालन करीत असून व्यवसाय करतात.
५. शेती (Cultivation)
. आदिवासीचा शेती व प्रमुख व्यवसाय अजून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. शेतीमध्ये कुटुंबातील सर्वच सदस्य राबतात. प्रामुख्याने पुरुष शेतीतील जड कामे करतो तर त्याला मदत घरातील स्त्रि करते. शेतीपासून उत्पन्न होणाऱ्या पिकांवर आदिवासी आपला उदरनिर्वाह करतात. डोंगराळ व दऱ्याखोऱ्यात उत्पन्न होणारी धान्य हे कोदू कुटकी असते.
मानवी जीवनातील आर्थिक परीवर्तन घडवून आणणारी शेती हि अर्थव्यवस्थेची प्रमुख घटक आहे. शेतीचा उपयोग प्राचीन काळापासून करण्यात येतो. शेती करण्याची प्रक्रिया नंतरची जरी असली तरी व्यावसायीकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. शेती करण्याच्या अगोदर मानव अन्नसंकलन करीत होता. शेतीतून पिकांचे उत्पन्न होते हे मानवाला माहित नव्हते, परंतु कालांतराने शेतीतील उत्पन्नाचा शोध लागल्यानंतर माणूस शेतीतून उत्पन्न घेवू लागला. अन्न, धान्य शेतीतून पिकवू लागते व त्यावर आपला उदरनिर्वाह करु लागला. आदिवासींची शेती करण्याची पद्धत अजूनही परंपरागत आहे. सभ्य समाज जरी तांत्रिक व आधुनिक शेती करीत असला तरी आदिवासी समाज तांत्रिकदृष्ट्या मागासलेला असून शेती पारंपारीक रित्याच करतो.
आदिवासी समाजामध्ये आजही शेती दोन प्रकारे करतात.
अ. स्थायी शेती (Permanent Cultivation)
ब. स्थानांतरीत शेती (Shifting Cultivation)
अ) स्थायी शेती (Permanent Cultivation) - बहुतांश आदिवासी स्थायी शेती करतात. परंतु हि शेती परंपरागत करतात, शेतीकरीता स्वतः ळचे बी-बीयाणे वापरणे, सेंद्रिय खतांचा वापर, शेतीची मशागत करण्याकरीता बैलांचा वापर करणे इ. तसेच नांगरणे, पेरणे, डवरणे, वखरणे इ. करीता बैलाचा व रेड्याचा वापर करतात. महाराष्ट्रातील मेळघाटमधील, कोरकू, मिझो, थारु, नागा जमात परंपरागत पद्धतीने शेती करतात.
ब) स्थानांतरीत शेती (Shifting Cultivation)
स्थानांतरीत शेतीसुद्धा आदिवासी करतात. भारतामध्ये उत्तरेकडील भागातील आदिवासी प्रामुख्याने स्थानांतरीत शेती करीत असल्याचे आढळते. स्थानांतरीत शेतीमध्ये जमीनीवरील जंगल साफ करुन जमिनीवरील पालापाचोळा पावसाळा सुरु होण्यापूर्वी एकत्र करुन जाळून टाकतात व राख संपूर्ण जमीनीवर पसरवितात पाऊस सुरु होतात, पेरणी सुरु करतात. लाकडी काठ्याने जमीनीमध्ये छिद्र करुन बी पेरतात. एकाच जमीनीमध्ये दोन-तिन वेळा पिक घेतल्यानंतर दुसरीकडे पिक घेतात. स्थानांतरीत शेती करण्याचा मागे धार्मिक उद्देश असून जमीनीला आदिवासी माता मानतात. जमिनीमध्ये नांगर चालवू नये असा धार्मिक हेतू आहे. भारतातील कोरवा, जंग, बैगा इ. जमात स्थानावरील शेती करीत असून त्याच्या शेतीला वेगवेगळी नावे आहेत.