आदिवासी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये - Characteristic of Tribal Economy

Tribal Mahavikas

आदिवासीची अर्थव्यवस्था साधी आहे असे म्हटल्या जाते. त्यांचे आर्थिक जीवन उच्च प्रतीचे नाही. केवळ आजचा विचार हा उद्देश असतो. भविष्याचा विचार न करता आज कमाई करुन आजच ती खर्च करावी उदयाचा विचार न करता आनंदीमय जीवन व्यतीत करणे आणि वेळप्रसंगी दारीद्र्यात जीवन व्यतीत करणे. आदिवासींची अर्थव्यवस्था सभ्य समाजासारखी नाही.

1. साधी अर्थव्यवस्था (Simple Economy) -
आदिवासींची अर्थव्यवस्था अत्यंत साधी सरळ आहे. नफाखोरी त्यामध्ये नाही. उदरनिर्वाहापूरतेच कमावणे आणि जीवन जगण्याकरीता लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करणे हा उद्देश आदिवासी अर्थव्यवस्थेचा आहे. शिकार मासेमारी, कंदमुळे संकलन करणे इ. केवळ स्वतःकरीता करणे व त्यावर उदरनिर्वाह भागविणे.

२. पैशाचा अभाव (Lack of Money)
आदिवासींच्या अर्थव्यवस्थेत प्रामुख्याने पैशाला महत्त्व नसते. जीवनावश्यक वस्तूचे संकलन स्वतःपूरतेच करतात. वस्तूचे उत्पादन स्वतःपूरते करुन आपल्या कुटुंबियांची गरज भागविणे व उरलेले उत्पादन संग्रहीत करुन ठेवणे. उत्पादन करुन त्यांचा विनिमय करीत नाही. काही वस्तूंची गरज असल्यास आपल्या जवळील वस्तू देवून दुसऱ्यांकडून वस्तू घेतल्या जाते. त्यामध्ये पैशांचा वापर करीत नाही.

३. तांत्रिक साधनाचा अभाव (Absence of Technical Aids)
अर्थव्यवस्था तांत्रिक साधनाचा अभाव आढळून येतो. अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून शेती असो वा शिकार यामध्ये तंत्रज्ञान विकसित झालेले दिसत नाही. शेतीमध्ये तांत्रिक साधनांचा वापर करीत नाही. तसेच शिकार करीत असतांना केवळ पारंपारीक शस्त्राचा वापर करतात. पशुपालन, मासेमारी करीत असतांना तांत्रिक साधनाचा वापर करीत नाही. आधुनिक जगासोबत संबंध येत नसल्यामुळे तंत्रज्ञान अवगत नाही.

४. श्रमविभाजन (Division of labour)
आदिवासींमध्ये श्रमविभाजनास महत्त्व दिल्या जाते. कुटुंबातील स्त्री आणि पुरुषांनी कोणती कामे करावी याचे विशेषीकरण केल्या जाते. पुरुष शेतीतील अवजड कामे करतो तर स्त्री त्याला साहय करते. पुरुष शिकार करतो व मासेमारी करतो तर आदिवासी स्त्रिया कंदमुळे संकलन करुन घरातील कामे करतात, मेहनतीचे काम पुरुष करतात तर हलके कामे स्त्रीया करतात. भिल्ल, गोंड, कोरकू जमातीमध्ये पुरुष अवजड कामे करतो तर स्त्रिया हलके काम करतात.

५. नफाखोरीचा अभाव (Absence of profit)
आदिवासींची अर्थव्यवस्था सरळ आणि साधी असल्यामुळे नफाखोरी नाही. बाजारपेठा, स्पर्धा त्यांच्यामध्ये नाही. मजूरी करीत असतांना ठेकेदार देईल तेवढेच पैसे घ्यायचे किंवा एखादी वस्तू विकत असतांना कमी पैशात विकणे इ. कोणत्याही वस्तूवर नफाखोरी करीत नाही. एखादी वस्तू खरेदी करताना मांगेल ते किंमत मोजणे.

६. सामुदायिक आधार (Collective Basic)
आदिवासींची अर्थव्यवस्था सामुदायिक आहे. एकमेकांना सहकार्य करणे, सहकार्य करणे इ. आदिवासींची अर्थव्यवस्था सामुदायिक आधारावर आहे. जमातीमधील सदस्यांना आर्थिक मदत करणे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत सदस्यांना साह्य करणे इ. कामे ते करतात.

७. धर्म व जादूचा प्रभाव (Impact of Religion and Magic)
आदिवासींच्या अर्थव्यवस्थेवर धर्माचा आणि जादूचा प्रामुख्याने प्रभाव दिसून येतो. रात्रदिवस आदिवासी निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीत्यांच्या दैनंदिन जीवनात वास करीत असते. रात्रंदिवस निसर्गाशी संघर्ष करावा लागतो. अशा परीस्थितीत उदरनिर्वाह करणे अत्यंत कठिण असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीतून मुक्ती मिळण्याकरीता व आर्थिक जीवन व्यवस्थित चालावे म्हणून आदिवासी धार्मिक विधी करतात. शेतीत पेरणी करण्यापूर्वी धार्मिक विधी करतात. शेतीतून उत्पन्न भरपूर येण्याकरीता पूजाअर्चा करतात. तसेच शिकारीला जाण्यापूर्वी पूजा करतात. आपल्या कार्यामध्ये किंवा अर्थार्जन करतांना योग्य यश येण्याकरीता मंत्रशक्तीचा वापर करतात आपण करीत असलेल्या कामामध्ये यश संपादन करण्याकरीता जादूचा वापर करतात.
आदिवासींच्या अर्थव्यवस्थेचा वरील प्रमाणे अभ्यास केल्यावर आदिवासींची अर्थव्यवस्था साधी असून केवळ दैनिक जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंची पूर्तता करणे यातच तिचा उद्देश दिसून येतो. आदिवासींची अर्थव्यवस्था आधुनिक अर्थव्यवस्थेच्या कोसो मैल दूर आहे हे सिद्ध होते.