केंद्रीय माहिती आयोग गठित करणे केंद्र सरकार ,राजपत्रातील अधिसूचनेद्वारे ,"केंद्रीय माहिती आयोग "या नावाने ओळखला जाणारा निकाय ,या अधिनियमान्वाये त्यास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्याला नेमून दिलेली कार्य पार पाडण्यासाठी गठित करील.
केंद्रीय माहिती आयोग हा पुढील व्यक्तींचा मिळून बनलेला असेल
(क ) मुख्य माहिती आयुक्त ; आणि
(ख ) आवश्यक वाटतील त्याप्रमाणे दहापेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त
मुख्य माहिती आयुक्ताची व माहिती आयुक्तांची नियुक्ती ,राष्ट्रपती , पुढील व्यक्तीची मिळून बनलेल्या समितीच्या स्शिफारासिनुसार करतील -
(एक) पंतप्रधान,जी या समितीची अध्यकश्य पदीय व्यक्ती असेल;
( दोन) लोकसभेतील विरोधी पक्ष् नेता ; आणि
(तीन ) पंतप्रधानांनी नामनिर्देशित करावयाचा एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री .
स्पष्टीकरण -शंका निरसनार्थ , याद्वारे असे घोषित करण्यात येते की लोकसभेतील विरोधी पक्ष्यानेता म्हणून एखाद्या व्यक्तीला मान्यता देण्यात आली नसेल त्या बाबतीत ,लोकसभेतील विरोधी पक्षांतील सर्वात मोठ्या गटाच्या नेत्यास विरोधी पक्षनेता मानण्यात येईल.
केंद्रीय माहिती आयोगाच्या कामकाजाचे सर्वसाधारण अधीक्षण, संचालन आणि व्यवस्थापन हे मुख्य माहिती आयुक्ताकडे निहित असेल व त्याला माहिती आयुक्त साहाय्य करतील आणि केंद्रीय माहिती आयोगाला या अधिनियमाखालील कोणत्याही इतर प्राधिकरणाच्या निदेशांना अधीन न राहता स्वायत्तपणे वापरता येतील असे सर्व अधिकार त्यास वापरता येतील आणि करता येत असतील अशा सर्व कृती व गोष्टी त्यास करता येतील.