तू सतत मागत होतास
माझ्या भावा, तुला
नेसण्यासाठी मी धोतर देईन
मला धोतर नको, ते काढून जाईल
माझ्या भावा, तुला कमरेला
बांधण्यासाठी मी साखळी देईन
तीही मला नको, ती तुटून जाईल
मनगटावर बांधण्यासाठी तुला कड़ी देऊ का ?
ही कडीदेखील लवकरच तुटून जातील
तुला अंगात घालण्यासाठी कोट देऊ का ?
कोटही फाढून जाईल
तुझ्या बाहूला बांधण्यासाठी कडे देऊ का ?
ते तुटणार नाही का ?
आणि कानात घालण्यासाठी कुडी ?
ही कुडीही मनगटाला बांधलेल्या कल्याप्रमाणे तुटणार नाहीत का?
मग तर तुला फेटा बांधण्यास नकीच आवडेल
परंतु ह्या सर्व गोष्टी फार काळ टिकणार नाहीत
मग तर मी तुला धान्याचे कोठार देईन
परंतु कोठारामधील धान्यही संपून जाईल
मग मी तुला रोख पैसे देऊ का ?
परंतु तेही खर्च होतील
मग गायींनी भरलेले गोठे तुला उपयोगी पडतील
परंतु गोठ्यामधील गायीसुद्धा मरतील
तर मग ती तुला सोन्याची वधू देईन'
हे गाणे म्हणजे नवरा मुलगा व त्याचा मोठा भाऊ ह्यांच्यामधील काल्पनिक संभाषण आहे. नवच्या मुलास काही वस्तू भेट
दिल्या म्हणजे तो समाधानी होईल असे मोठ्या भावाला
वाटते. परंतु त्याने सुचविलेल्या सर्व वस्तू काही ना काहीतरी कारण सांगून नवरा मुलगा नाकारतो.
वराला लागणारे कपडे व दागिने ह्यासंबंधी वारल्यांच्या कल्पना ह्या गाण्यात पहावयास मिळतात. धोतर, कोट व फेटा एवडे कपडे त्यांना पुरे होतात. कमरेसाठी चांदीची साखळी, तोडा, मनगटासाठी वाळे, बाहूसाठी कडे व कानात घालण्यासाठी कुडी ह्या त्यांच्या दागिन्यासंबंधीच्या कल्पना आहेत. परंतु कपडे किंवा दागिने टिकत
नसल्यामुळे त्या चांगल्या भेटवस्तू म्हणून मानत नाहीत. ह्या वस्तू नसल्या तरी त्यांचे अडत नाही. ह्या वस्तू
मिळाल्या नाहीत म्हणजे सहाजिकच
त्यांचे मन अन्नाकडे वळते. परंतु अन्नही संपून जाईल व पैसाही खर्च होईल. ह्या सवपेिक्षा गाय
अधिक मौल्यवान आहे पण तीही मरते. शेवटी वधू हो भेटवस्तू म्हणून सुचविली जाते व ही भेट नवयामुलास एकदम पसंत पडते. ह्या गाण्यात वारल्यांच्या जीवनाकडे पाहाण्यासंबंधीच्या कल्पना
संदिग्ध भाषेत सांगितलेल्या
आहेत. वधू म्हणजेच पत्नी ही दिल्या
जाणाऱ्या सर्व भेटीतील परिपूर्ण भेट मानली
जाते.
नारण बरंभा देवाला विवाह समारंभास बोलविण्यात येऊन त्याला समारंभाची सर्व तयारी करण्यास सांगण्यात आले. त्याने
गणोबा देवाला वाद्य वाजविण्यास व गरजाई देवीला धवलेरी म्हणून बोलावले. नारणदेवाने
चंद्रदेव (चांदोबाला ) आमंत्रित केले. तसेच त्याने कालका, भारजाई, गंगागौरी, महालक्ष्मी, हातीन- (हत्ती देवता) तिवराई + ह्यांनाही बोलावले. नारणदेवाने हिरोबा (हिरवा)
देवाला विवाह समारंभासाठी
ब्राह्मणाला बोलविण्यास सांगितले. तो ब्राह्मणाच्या शोधार्थ अनेक ठिकाणी फिरला व शेवटी
त्याला एक ब्राह्मण सापडला. त्याच्याकडून त्याने पवित्र ग्रंथ मिळविले. लग्नविधीसाठी एक घोडा आवश्यक होता. हिरवादेव
त्याच्या शोधार्थ रानात गेला.
परंतु तेथे त्याला एकही घोडा मिळाला नाही. त्याने दुधाच्या तलावात एक घोडा पाहिला. त्याने
घोड्याला पकडून दुधाने त्याचे स्नान केले. त्याच्या अंगावर रेशमी वस्त्रे घातली आणि तो त्याच्यावर स्वार झाला.
'नवरदेवानेही (वरराजा)
विवाहाचा पोशाख परिधान करण्यास प्रारंभ केला. त्याने पायांत बूट घातले, धोतर नेसले, अंगामध्ये कोट घातला व
डोक्याला फेटा बांधला. त्याने
हातात सोनेरी चाबूक घेतला, सूर्याला व
चंद्राला नमस्कार केला आणि रिकिबीत पाय
ठेवले. अशा तऱ्हेने घोड्यावर स्वार होऊन तो वधूकडे जाण्यास निघाला. त्यानंतर ते सर्वजण सोन्याच्या मंडपात आले.
ब्राह्मणाने पोथी बाहेर काढली व तो वाचू
लागला. ब्राह्मणाने एक घडी ( एक घटिका २४ मिनिटे ) पूर्ण केली. त्याने चार व आठ घड्या पूर्ण
होईपर्यंत वाचणे चालूच ठेवले. परंतु विवाहासाठी सोळा घड्या वाचणे जरुरीचे असते. ब्राह्मण म्हणाला 'सावधान' आणि गणोबा
देवाने लगेच वाजंत्री
वाजविण्यास सुरुवात केली.
ह्या गाण्यात असे दर्शविले आहे की वर एक खास पोशाख परिधान करून घोड्यावर स्वार होऊन वधूकडे जातो. ब्राह्मण व
त्याच्या पोथ्या विवाहाचे विधी करण्यासाठी
आवश्यक असतात. गाण्याच्या अखेरच्या भागात घटिका व सावध ह्या शब्दांचाही उल्लेख केला आहे.
परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांच्या विवाहात ह्या कोणत्याच गोष्टींची आवश्यकता
नसते. वरातीत घोडा
नसतो. ब्राह्मणाला कुठे स्थान नसते आणि मंगलाष्टकेही म्हटली जात नाहीत. विवाहाला मुहूर्त
लागत नाही किंवा घटिकांचाही वापर केला जात नाही. हे गाणे रचणाऱ्यावर हिंदू जातीच्या चालीरीतींचा प्रभाव पडला
आहे हे स्पष्ट होते. हे वारल्यांच्या
विवाहाचे दृश्य नसून हिंदू जातीच्या विवाहाचे दृश्य आहे. ते ज्या गरीब स्थितीत विवाह समारंभ साजरा
करतात, त्याचा गौरव करणे त्यांना
योग्य वाटले नाही. म्हणून त्यांनी
विवाहाच्या आदर्शाची कल्पना ह्या गाण्यात मांडली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये ह्या गाण्याचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे :
'जा बोलवा कुणा एका देवाला.
जा बोलवा कणसरी मातेला.
कणसरी माता घोड्यावर बसली.
तुम्ही यावे लग्नाच्या दारी.
लग्नाची वेळ झाली.
लग्नाची घटका भरत आली.
जा बोलवा धरतरी मातेला.
तुम्ही यावे लग्न मंडपाच्या दारी
लग्नाची वेळ झाली.
जा बोलवा कणसरीच्या बाळाला.
तुम्ही जांभळ्या रंगाच्या घोड्यावर बसावे.
तुम्ही लग्न मंडपाच्या दारी यावे.
लग्नाची वेळ झाली.
जा बोलवा ब्रह्मा देवाला.
हे घोड्यावर बसलेल्या ब्रह्मा देवा.
तुम्ही लग्न मंडपा दारी यावे.
ब्राह्मण जांभळ्या घोड्यावर बसला.
'त्याने हातात पवित्र पोथी
धरली.
त्याने हातात पितळी तांब्या घेतला.
ब्राह्मणाने विवाह मंडपात प्रवेश केला.
त्याने घोडा दालनाच्या दाराशी बांधला.
आणि तो मंडपाच्या दाराशी बसला.
त्याने पवित्र पोथ्यांचा भारा उघडला.
आणि पोथी वाचण्यास सुरुवात केली.
मलय मासा, कोलंबीचे कवच.
काळे मणी आणि सफेत वाटी.
ब्राह्मण म्हणाला, 'सावधान.
ब्राह्मण म्हणाला, 'आशीर्वाद.'